वीर सावरकर हे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं दैवत; इथे तडजोड नाही; संजय राऊतांचा इशारा

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू , गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाही. जय हिंद, असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांवरुन केलेल्या वक्तव्यावर राऊत यांनी शिवसेनेची भूमिक स्पष्टपणे मांडली आहे.

देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरुन झारखंडमधील सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना म्हटले होते की, मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया. मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून काल संसदेत भाजप खासदारांनी गोंधळ घालत राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला होता.

त्यानंतर सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील काँग्रेसच्या भारत बचाओ रॅलीत राहुल गांधीं यांनी रेप इन इंडिया विधानाबाबत म्हटले की, माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापि माफी मागणार नाही. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. यावर आता शिवसेनेनेही आपली स्पष्ट आणि आक्रमकपणे मांडत काँग्रेसला सुनावले आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्याने भाजप अगोदरच नाराज आहे. त्यातच राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ उठल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल यांच्या वक्तव्यावर आपली भूमिक स्पष्ट करत ट्विट केले आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.