एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर स्वागतच : अजित पवार

Ajit Pawar
15th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर त्यांचे स्वागतच करु, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावरून पक्षनेतृत्वावर जोरदार हल्लोबोल करत मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त केली होती. पंकजाताई भाजपातच आहेत, माझा काही भरवसा नाही, असेही खडसे म्हणाले होते. यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचे स्वागत करेल. पंकजा मुंडे यांची नाराजी हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस तुम्हाला बंडाचे नायक म्हणाले, यावर अजित पवारांची प्रतिक्रिया विचारली असता ते नो कॉमेण्टस, असे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, शिवसेनेसाठी भाजपची दारे खुली आहेत. याबाबत पवार म्हणाले, भाजपाने शिवसेनेला ऑफर देऊ दे की काहीही, हरकत नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. सध्या शिवसेना आमच्यासोबत आहे एवढेच मी सांगेन. महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, याबाबतचा योग्य निर्णय शरद पवार घेतील.

visit : npnews24.com