मदर डेअरीने वाढवले दूधाचे दर, रविवारपासून ३ रुपये प्रति लीटरने महागणार

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – मदर डेअरीने दूधाचे दर प्रति लीटर ३ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दूधाची ही दरवाढ दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारपासून लागू होणार आहे. मदर डेअरीने दूधाच्या किमती वाढणार असल्याची माहिती शनिवारी दिली. मदर डेअरी दिल्ली-एनसीआर क्षेत्रात दररोज सुमोर ३० लाख लीटर दूधाचा पुरवठा करते. यामधील ८ लाख लीटर दूध गायीचे असते.

सप्टेंबरमध्येही झाली होती दरवाढ
मागील सप्टेंबर महिन्यातही मदर डेअरीने दूधाच्या किमतीत २ रुपये प्रति लीटर वाढ केली होती. परंतु, गायीच्या दुधात कोणीही दरवाढ केली नव्हती. मात्र, अर्धा लीटरच्या पिशवीवर १ रुपयाची वाढ केली होती. दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या मदर डेअरी एक लीटर फुल क्रीम दूध ५४ रुपयांना मिळते. जे रविवारपासून ५७ रुपये होणार आहे.

नवीन दर
मदर डेअरीने टोन्ड दूधाचे दर २ रुपयांनी वाढवले आहेत, यामुळे ते आता ४२ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर, फुल क्रीम दूधाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. आता हे ५५ रुपये प्रति लीटरने मिळणार आहे. अर्धा लीटर फुल क्रीम दूध २७ रुपयावरून २८ रुपये झाले आहे.

का केली दरवाढ
मदर डेअरीने म्हटले आहे की, देशातील अनेक राज्यात दूध उत्पादन कमी झाले आहे. याचे मुख्य कारण मान्सून आणि फ्लश सिझन सुरू होण्यास झालेला उशीर होय. बिघडलेल्या पर्यावरणाचाही प्रभाव यावर पडला आहे. या कारणांमळे दूध उत्पादकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.