तुम्ही ‘त्यांचे’ वारसदार शोभता; राहुल गांधींना भाजपानं सुचवलं ‘हे’ आडनाव

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – तुम्हाला गांधी नव्हे, जिन्ना आडनाव जास्त शोभून दिसेल. मुस्लिमांच्या लांगुलचालनाच्या राजकारणामुळे आणि मानसिकतेमुळे तुम्ही सावरकरांचे नाहीत, तर मोहम्मद अली जिन्नांचे योग्य वारसदार शोभता, अशा शब्दांमध्ये भाजपा प्रवक्ते आणि खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. राव केलेले हे ट्विट काँग्रेसलाही टॅग केले आहे.

देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरुन झारखंडमधील सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना म्हटले होते की, मोदी म्हणाले होते मेक इन इंडिया. मात्र जिथे पाहावं तिथं रेप इन इंडिया दिसत आहे. त्यांच्या या वक्व्यावरून काल संसदेत भाजप खासदारांनी गोंधळ घालत राहुल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. पेटलेल्या ईशान्य भारतावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून वाद निर्माण केला जात आहे. परंतु, मी माझ्या विधानावर ठाम आहे. माफी मागणार नाही, अशी भूमिका राहुल यांनी मांडली होती.

त्यानंतर सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील काँग्रेसच्या भारत बचाओ रॅलीत राहुल गांधीं यांनी रेप इन इंडिया विधानाबाबत म्हटले की, माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापि माफी मागणार नाही. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. यावरून आता राव यांनी राहुल गांधी यांना खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

तत्पूर्वी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील राहुल यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वीर सावरकर खरेखुरे देशभक्त होते. आडनाव उधार घेऊन कोणी गांधी होत नाही, कोणी देशभक्त होऊ शकत नाही. देशभक्त होण्यासाठी धमन्यांमध्ये शुद्ध हिंदुस्तानी रक्त असायला हवं. वेश बदलून अनेकांनी देशाला लुटलं आहे. मात्र आता तसं होणार नाही. हे तीनजण कोण आहेत? हे तिघे देशाचे सामान्य नागरिक आहेत का?,ङ्क असे म्हणत गिरीराज यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींचा फोटो ट्विटला जोडला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.