सध्याचे मंत्रिमंडळ तात्पुरते, महिनाअखेरपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार
पिंपरी-चिंचवड : एन पी न्यूज 24 – महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना सध्या जे खाते वाटप झाले आहे ते तात्पुरते आहे. महिनाअखेरपर्यंत मंत्रीमंडळाचे संपूर्ण स्वरुप स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. ते पिंपरी-चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, राज्य मंत्रिमंडळात एकूण मंत्रीसंख्या ४३ इतकी असते. सध्या मुख्यमंत्रीधरून ७ जण राज्याचा कारभार पाहत आहेत. अशाप्रकारे जास्त दिवस कारभार पाहू शकत नाही. केवळ नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापुरता ते कारभार निभावू शकतात. अधिवेशनात काही प्रश्न निर्माण झाल्यास हे सहा ही जण ते सांभाळून घेऊ शकतात. कारण सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात अनुभवी मंत्री आहेत. यातील काही जणांनी दहा ते पंधरा वर्षे मंत्रीपदावर काम केले आहे. परंतु, मंत्रीमंडळाचा विस्तार कधी करायचा, कोणाला कोणते मंत्रीपद द्यायचे याचा निर्णय तिन्ही पक्षांचे प्रमुख घेणार आहेत, असे पवार म्हणाले.
visit : npnews24.com