देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले, सरकार दारुड्यासारखे वागतेय

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – देशातील पब्लिक सेक्टर हे आता प्रायव्हेट सेक्टर होत चालले आहे. बँका बुडाल्या असून भारत पेट्रोलियम, एअर इंडिया या कंपन्यांची विक्री सरकार करत आहे. या रांगेत आणखी काही सरकारी कंपन्या आहेत. आज, स्वत:ला देशभक्त म्हणणारे देश विकणारे झाले आहेत, अशी टीका वंचित बहुजन महाआघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शेअर मार्केटमध्ये भारत पेट्रोलियम आणि एअर इंडियाचे किती शेअर आहेत, हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे, सरकारने एक समिती नेमूण नागरिकांना हे शेअर विकत घेण्याचे आवाहन करावे. लाखो लोक यामध्ये सहभागी होतील. या सरकारी कंपन्या देशाचे नवरत्न म्हणजे दागिने आहेत. यासाठी आम्ही सरकारला १५ दिवसांचा अवधी देत आहोत. अन्यथा, निवृत्त न्यायाधीशांना सोबत घेऊन आम्ही एका समितीची नेमणूक करुन, देशातील नागरिक एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिमयचे शेअर किती रुपयांना विकत घेतील, याचा अभ्यास करू.

सध्या सरकारचा महसूल पूर्णपणे ढासळल्याने सरकार देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विकत आहे. जसा एखादा दारूडा आपल्या घरातील सामान आणि बायकोचे दागिने विकतो, तसेच हे सरकार देशाचे दागिने विकत आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.