पेट्रोल ३ दिवसात १६ पैशांनी स्वस्त, डीझलचे दर स्थिर
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –पेट्रोलच्या दर शनिवारी सलग तिसऱ्यांदा कमी झाले आहेत. या तीन दिवसात पेट्रोल दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये १६ पैसे, तर कोलकातामध्ये १७ पैसे स्वस्त झाले आहे. सध्या डिझलच्या दरात सलग पाच दिवसात कोणतेही बदल झालेले नाहीत.
अंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझलच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी शनिवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलचे दर ५ पैशांनी कमी केले. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर कमी केल्यानंतर अनुक्रमे ७४.८४ रूपये, ७७.५० रुपये, ८०.४९ रुपये और ७७.८१ रुपये प्रति लीटर झाले आहे. चार शहरांमध्ये डिझलचे दर अनुक्रमे ६६.०४ रुपये, ६८.४५ रुपये, ६९.२७ रुपये आणि ६९.८१ रुपये प्रति लीटर वर स्थिर आहेत.
visit : npnews24.com