खाण्या-पिण्याच्या वस्तूनंतर आता औषधे महागणार, NPPA ने हटविले हे निर्बंध

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – लवकरच सर्वसामान्य कारणांसाठी वापरली जाणारी औषधे महागण्याची शक्यता आहे. या औषधांमध्ये अँटीबायोटीक्स, अँटी-अ‍ॅलर्जी, अँटी-मलेरिया, बीसीजी लस आणि व्हिटॅमिनचा समावेश आहे. औषधांचे दर नियंत्रणात ठेवणारी रेग्युलेटर नॅशनल फार्मास्यूटिकल प्रायसिंग अथॉरिटी म्हणजेच एनपीपीएने शुक्रवारी सीलिंग प्राईजवर लावलेल्या निर्बंधांना ५० टक्क्यांनी वाढवले आहे. एनपीपीएचे म्हणणे आहे की, लोकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, औषधांच्या उपलब्धतेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, आतापर्यंत याचा उपयोग औषधांच्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आला आहे. एनपीपीएने हे पाऊल फार्मा इंडस्ट्रीच्या मागणीनंतर उचलले आहे. फार्मा इंडस्ट्रीने एनपीपीएकडे मागणी केली होती की, औषधे बनविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या वस्तूंचे भाव जास्त आहेत, यासाठी औषधांवरील किमती वाढविल्या जाव्यात.

चीनकडून आयात करण्यात येत असलेल्या घटकांचे दर पर्यावरणाच्या कारणांमुळे सुमारे २००पट वाढले आहेत. शुक्रवारी एनपीपीएच्या बैठकीत एकुण १२ औषधांबाबत निर्णय घेण्यात आला. ही औषधे सतत प्राइज कंट्रोलमध्ये राहीली आहेत. या निर्णयाबाबात एनपीपीए म्हटले की, ही औषधे फस्ट लाईन ट्रीटमेंटच्या वर्गात येतात आणि देशात लोकांच्या आरोग्यासाठी खुप जरूरी आहेत. अनेक कंपन्या ही औषधे बंद करण्याच्या विचारात आहेत. ही औषधे कमी किमतीत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. औषधांसाठी वापरण्यात येणारा कच्चामाल उपलब्ध न झाल्याने औषधे बाजारात उपलब्ध होणार नाहीत. असे झाले तर लोकांना इतर महागडी औषधे खरेदी करावी लागतील.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.