येथे मोफत मिळतोय FASTag! आज रात्रीपर्यंत नाही लावला तर भरावा लागेल दुप्पट टोल

नवी दिल्ली :एन पी न्यूज 24 – १४ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर महार्गावरून जाताना तुम्हाला थोडे सावध रहावे लागणार आहे. कारण, जी वाहने फास्टटॅग न लावता टोलनाक्यावरील फास्टटॅग लेनमधून जातील त्यांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. १५ डिसेंबरपासून टोलनाक्यावरून जात असेलेल्या वाहनांसाठी फास्टटॅग अनिवार्य असल्याची नोटीस परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने जारी केली आहे. हा फास्टटॅग कसा मिळवावा, कोणत्या बँकांकडे उपलब्ध आहे, याबाबत आपण माहीती घेणार आहोत.
येथे मिळेल फास्टटॅग
अॅक्सिस बँकेने काही महिन्यांसाठी ग्राहकांना फास्टटॅग मोफत केला आहे. तसेच तुम्हाला सरकारकडूनही २.५ टक्के कॅशबॅक ऑफर मिळत आहे. कोटक महिंद्रा बँकेनेही १५ डिसेंबरपर्यंत फास्टटॅग मोफत केला आहे. एचडीएफसी बँकेनेही ३१ डिसेंबरपर्यंत फास्टटॅग मोफत उपलब्ध करून दिला आहे. १०० रुपये प्रोसेसिंग फीसुद्धा एचडीएफसी घेणार नाही.
फास्टटॅग म्हणजे काय?
आरएफआयडी अथवा रेडियो फ्रीक्वेन्सी इन्फ्रारेड डिवाइस, एक छोटी चिप म्हणजे स्टीकर आहे. हे स्टीकर वाहनाच्या समोरच्या काचेवर लावायचे आहे. याच स्टीकरला फास्टटॅग म्हणतात. यामाध्यमातून तुमचे टोलचे पैसे बँकखात्यातून वळते होणार आहेत. सरकार या फास्टटॅगचा वापर अन्य ठिकाणीही करण्याच्या विचारात आहे. पार्किंग, पेट्रो लपंप येथेही याचा उपयोग भविष्यात होऊ शकतो.
visit : npnews24.com