उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवारांऐवजी दुसऱ्याच नावावर शिक्कामोर्तब?

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानंतर याबाबत निर्णय होऊ शकतो. मंत्रिमंडळातील महत्वाची खाती कुणाला मिळणार यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे वृत्त असून आता उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार याची उत्सुकता कायम आहे. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असून अजित पवार यांचे नाव मागे पडल्याचे समजते. त्याऐवजी दुसऱ्याच नावाची चर्चा आहे.

राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील या दोन नेत्यांमध्ये चुरस आहे. मात्र, जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत राष्ट्रवादी सकारात्मक असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. अजित पवार यांना अर्थखाते मिळू शकते, असा अंदाज आहे. राज्य सरकारचे खातेवाटप लांबल्याने महाविकास आघाडीवर टिका सुरू झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन यात लक्ष घातले आहे.

पवार यांनी शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा करून पक्षनिहाय खातेवाटपाचे चित्र स्पष्ट केले आहे. शिवसेनेला १०, राष्ट्रवादीला ७, तर काँग्रेसला ६ खाती मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदही जयंत पाटील असू शकते. यामुळे महाविकास आघाडीत जयंत पाटील क्रमांक दोनचे मंत्री असू शकतात.

visit : npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.