विरोधीपक्षनेतेपदासाठी भाजपच्या ‘या’ दोन नेत्यांमध्ये चढाओढ!

मुंबई : एन पी न्यूज 24 – विधानसभेचे विरोधीपक्षनेतेपद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्यानंतर आता विधान परिषद विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी भाजप नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यामध्ये भाई गिरकर आणि डॉ. परिणय फुके यांची नावे आघाडीवर आहेत. लवकरच भाजपकडून विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेत्याची नियुक्त होऊ शकते.
मागच्यावेळी भाजपचे विधान परिषदेचे गटनेते चंद्रकांत पाटील हे होते. आता ते विधानसभेचे सदस्य म्हणून निवडूण गेल्याने विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेत्याची नियुक्ती भाजपकडून केली जाणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये या पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. विदर्भातील डॉ. परिणय फुके, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि भाई गिरकर यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून विधान परिषद विरोधीपक्ष नेतेपद विदर्भाला यापूर्वी दोनदा मिळालेले आहे. नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर यांनी हे पद भुषवलेले आहे. त्यामुळे डॉ. फुके यांचे नाव मागे पडले तर तर भाई गिरकर यांना संधी मिळू शकते. सध्या तरी डॉ. फुके आणि गिरकर यांच्यात चढाओढ दिसून येत आहे.
visit : npnews24.com