बीड : एन पी न्यूज 24 – भाजपावर नाराज असलेल्या नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरील भाषणात पक्षनेतृत्वावर थेट आणि जहरी टिका केल्याने या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चुका माणसांकडून होतात, पक्षावर कशाला राग काढता, असे त्यांनी म्हटले आहे.
Related Posts
नाथाभाऊंची वेदना समजू शकतो. त्यांनी दु:ख व्यक्त केले, त्यात चूक नाही. तुमच्या तक्रारी आणि व्यथांची दखल पक्ष घेईल, त्यावर उत्तर काढू. माझी दोघांना विनंती आहे की, भविष्यात सर्व नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल असे संवेदनशील शब्द वापरु नका, त्याचे ओरखडे राहतात. नाथाभाऊ तुम्ही ज