Loan Guarantor | विचारपूर्वक राहा Loan गॅरंटर ! लोन डिफॉल्ट झाल्यास भरावे लागतात पूर्ण पैसे, जाणून घ्या सविस्तर

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Loan Guarantor | कर्ज घेणे आणि एखाद्याला जामीनदार राहण ही आर्थिक जबाबदारी आहे. जामीनदार होण्यापूर्वी लोक अनेकदा विचारपूर्वक निर्णय घेत नाहीत आणि आपल्या मित्राच्या, नातेवाईकाच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या कर्जाचे जामीनदार (Loan Guarantor) बनतात. परंतु अनेक वेळा कर्जदार वेळेवर कर्जाची परतफेड करत नाही आणि त्याची बँक किंवा वित्तीय संस्था त्याला डिफॉल्टर म्हणून घोषित करते. अशा स्थितीत त्या कर्जाचा जामीनदार असलेल्या व्यक्तीसाठी अडचण निर्माण होऊ शकते. याबाबत जाणून घेऊया…

लोन डिफॉल्ट (Loan Default) झाल्यास क्रेडिट स्कोअर (Credit Score) होतो खराब
बँकेने एखाद्याला कर्ज थकबाकीदार (Loan Defaulter) म्हणून घोषित केले, तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यानंतर त्या व्यक्तीला कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज (Bank Defaulter) मिळत नाही. यासोबतच बँकेत जमा असलेली मालमत्ताही बँक जप्त करून पैसे वसूल करू शकते.

कर्ज डिफॉल्ट झाल्यास जामीनदारावर होतो परिणाम –
कर्ज न भरल्यास कर्जाच्या जामीनदारालाही मोठा फटका बसतो.
यामध्ये बँक कर्ज न भरल्यास नोटीस पाठवून हमीदाराशी संपर्क साधते.
कारण कर्ज देताना बँक आणि जामीनदार यांच्यात करार असतो. (Loan Guarantor)

ज्यामध्ये कर्जदाराने वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही तर जामीनदाराला व्याजासह थकबाकीची रक्कम भरावी लागते, असे स्पष्ट लिहिलेले असते. अशा स्थितीत जामीनदाराकडून कर्ज वसूल करण्याचा बँकेला कायदेशीर अधिकार आहे.

जामीनदार होण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा –
कोणत्याही व्यक्तीच्या कर्जाचा जामीनदार होण्यापूर्वी, तुम्ही ज्याच्या कर्जाचा जामीनदार होणार आहात, ती व्यक्ती तुम्हाला चांगली माहिती आहे याची विशेष काळजी घ्या. यासोबतच त्याच्या आर्थिक स्थितीची अचूक माहिती ठेवा. तसेच त्या व्यक्तीने यापूर्वी कोणतेही कर्ज बुडवलेले नाही ना हे देखील तपासा.

Web Title :- Loan Guarantor | loan guarantor full money has to be paid in case of loan default know everything

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नवी सुविधा ! केवळ 1 मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटूंबाला मिळेल Aadhaar PVC card, पहा सोप्या स्टेप्स

Pune NCP | बंडातात्या कराडकर यांच्या विधानाचा पुणे राष्ट्रवादीकडून ‘जोडे मारो’ आंदोलन करुन निषेध

Reduce Fat | वेगाने फॅट कमी करण्यासाठी उपयोगी आहेत ‘या’ गोष्टी, त्यांचा आहाराच्या यादीत आवश्य करा समावेश

Leave A Reply

Your email address will not be published.