लग्नानंतर तिला समजलं पती आहे ‘गे’, मग तिनं पुढं केलं ‘असं’ काही !

0

औरंगाबाद : एन पी न्यूज २४ औरंगाबादमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती गे असूनही बी बाब त्याने पत्नीपासून लग्नापूर्वी लपवून ठेवली. परंतु लग्न झाल्यानंतर पत्नीला तो गे असल्याचे माहीत पडताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक आणि छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. सदर महिला 34 वर्षांची आहे. तिच्या कुटुंबियांनाही ही बाब माहिती नव्हती.

‘गे’ आहे हे लपवून ठेवले

सदर मुलीचे शहरातील एका मुलाशी लग्न ठरले. थाटामाटात लग्न केलेल्या पतीने सदर मुलीला किंवा तिच्या कुटुंबियांना तो गे असल्याचे सांगितले नाही. सर्वांपासून ही बाब लपवून ठेवली. परंतु पत्नीला याचा खुलासा लग्नानंतर झाला.

काय म्हटलं आहे तक्रारीत

पत्नीने तक्रारी म्हटलं आहे की, लग्नानंतर तिला शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिला. लग्नातील 5 लाखांचा खर्च, 20 तोळ्याची सोन्याची बिस्कीटे व दागिने अशी 10 लाखांची फसवणूक करण्यात आली. सदर घटना या 23 जानेवारी 2019 ते 28 मार्च 2019  दरम्यानच्या आहेत असाही उल्लेख करण्यात आला आहे. पतीसह चौघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला  आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.