रानू मंडल यांच्यावर ‘कमेंट’ केल्यानंतर गान कोकिळा लता मंगेशकर झाल्या ‘ट्रोल’ !

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –  रानू मंडल या महिलेच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देखील मिळाली. तिचा आवाज लाइमलाईटमध्ये आल्यानंतर तिला हिमेश रेशमियाने एक गाणे गाण्याची संधी देखील दिली. त्यानंतर तिचे सर्व स्तरातून कौतुक देखील करण्यात आले. तिने लता मंगेशकर यांची अनेक गाणे गाऊन आपल्या आवाजातील गोडवा लोकांसमोर सादर केला. मात्र त्यानंतर लता मंगेशकर यांनी तिला कुणाचीही नकल न करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांच्या या सल्ल्यावरून त्यांना नेटिझन्सनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.

त्यांच्या ट्विटनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले असून अनेक जणांनी चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत तर काही जणांनी अतिशय निगेटिव्ह कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले कि, लता मंगेशकर यांनी त्यांच्या काळात अनेक गायिकेचें करियर उध्वस्त केले, त्यामुळे त्या कुणाला अशाप्रकारचा सल्ला  कश्या देऊ शकतात. त्याचबरोबर एकाने लिहिले आहे कि, तुम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना कमी का लेखत आहात. त्यामुळे मी तुमच्या या मुद्द्याशी सहमत नसल्याचे त्याने म्हटले. त्याचबरोबर त्यांना अनेक निगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागला. तर काही जणांनी म्हटले कि, लता मंगेशकर या रानू मंडल यांचा तिरस्कार करू लागल्या आहेत. मात्र या प्रकरणावर रानू मंडल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून त्या यावर काय म्हणतात हे पाहणे महत्वाचे आहे.

  काय म्हणाल्या होत्या लता मंगेशकर

एका खासगी एजन्सीला मुलाखत देताना त्या म्हणाल्या होत्या कि,जर माझ्या नावाने आणि कामाने कुणाचे भले होत असेल तर मी स्वतःला नशीबवान समजते. मात्र नकल करून कुणीही जास्त दिवस चालणार नाही, असंदेखील त्यांनी मुलाखतीत म्हटले होते. त्याचबरोबर स्वतःचे गाणे तयार करून गाण्याचा देखील सल्ला त्यांनी रानू यांना दिला होता. मात्र त्यांच्या या मुलाखतीनंतर त्यांना या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.