Mahesh Manjrekar | दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांना राज्य महिला आयोगाकडून दणका ! आगामी चित्रपटाबाबत खुलासा करण्याच्या सूचना, जाणून घ्या प्रकरण

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर (Nay Varan Bhat Loncha Trailer) प्रकाशित करण्यात आला आहे. या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य या चित्रपटातून (Nay Varan Bhat Loncha) वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची या निर्मितीमागची संकल्पना, कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविल्याची माहिती आयोगाच्या (Maharashtra State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकार (Rupali Chakankar) यांनी दिली.

मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.  ट्रेलर पाहून समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर (Social Media) उमटत आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारे तक्रारपत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगास प्राप्त झाले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जळजळीत सत्य दाखवण्याच्या नावाखाली स्त्रियांची अवहेलना केल्याचे चित्रपटाच्या ट्रेलर वरून दिसत आहे. त्यासोबतच लहान मुलांच्या बाबतही चुकीची दृश्य दाखविण्यात आली आहेत. त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी आक्षेप नोंदविला आहे (Parents of children seeking online education have objected.) या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक म्हणून या निर्मिती मागची संकल्पना, कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेणे उचित वाटते. याप्रकरणी लेखी स्वरूपातील खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार आयोगास तात्काळ पाठविण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title : – Mahesh Manjrekar | Director actor Mahesh Manjrekar  Maharashtra State Women’s Commission! Matter of Upcoming Movie, Learn Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव

One Exercise For Body Fat Loss | ‘या’ एका व्यायामाचा सराव करून शरीराची चरबी वरपासून खालपर्यंत एका आठवड्यात कमी करा

Ayurvedic Treatment For PCOD Problems | ‘या’ आयुर्वेदीक उपायाने होईल PCOD च्या समस्येवर मात; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.