पालकांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची एनईएमएस शाळेत प्रतिष्ठापना 

0
 पुणे:  एन पी न्यूज 24 –  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये (एनईएमएस ) पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. पालकांनी स्वहस्ते तयार केलेली शाडूच्या मातीची गणेशमूर्तीची शाळेत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शाळेच्या अध्यक्षा डॉ. सविता केळकर यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी शाळेतर्फे शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत पालकांनी तयार केलेल्या गणेशमूर्तीची शाळेत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी केलेल्या आवाहनातून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तीची स्थापना आपापल्या घरात करण्यात आली.
याशिवाय विद्यार्थ्यांनी स्वच्छ आणि सुंदर पुण्याचे देखावे तयार केले आहेत. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि महत्व कळावे म्हणून हे देखावे कलाशिक्षिका अपूर्वा आरगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहेत. यासाठी पूर्वप्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Leave A Reply

Your email address will not be published.