नेहरू कुटुंबावर आक्षेपार्ह टीका, या बॉलिवूड अभिनेत्रीला अटक

arrested
15th December 2019

मुंबई : एन पी न्यूज 24 – माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका करणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक करण्यात आली आहे. आज सकाळी राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथून तिला ताब्यात घेतले. स्वतः पायलने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1206074851276083200

मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून अटक केली. मी जे बोलले ती सर्व माहिती गूगलवरून घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक थट्टा राहिली आहे, असे ट्विट पायलने सकाळी केले. तिने हे ट्विट पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला टॅग केले आहे. पायलविरोधात कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर तिला अटक करण्यात आले, असे एसपी ममता गुप्ता यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

काय आहे प्रकरण
पायलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात म्हटले होते की, मला वाटतं की मोतीलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या, म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासोबतच मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे सावत्र वडील होते. या ट्विटमध्ये तिने एलिना रामाकृष्णाने लिहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला आहे.

visit : npnews24.com