‘ही’ बोल्ड अभिनेत्री बनणार भाऊ कदमची ‘बायको’

0

मुंबई : एन पी न्यूज २४ – वाक तुरु तुरु, लई भारी पोरी, इश्काचा किडा यांसारख्या धम्माल म्युझिक अल्बम्समधून गाजलेली शितल अहिरराव आता लवकरच विनोदी सिनेमात दिसणार आहे. व्हीआयपी गाढव या सिनेमात शितल भाऊ कदमसोबत त्याच्या बायकोच्या भूमिकेत दिसणार आहे. शितल प्रथमच गावरान बाईचा रोल साकारणार आहे. संजय पाटील दिग्दर्शित हा सिनेमा 13 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. H2O कहाणी थेंबाची या सिनेमात सियाच्या भूमिकेत तुम्ही शितलला पाहिलं आहे.

विनोदी भूमिका साकारणं भल्याभल्यांना कठिण जातं. याशिवाय व्हीआयपी गाढव या सिनेमात शितल भाऊ कदम सोबत झळकणार आहे. त्यामुळे शितलसमोर मोठं आव्हान असणार आहे. आतापर्यंत केवळ मॉडर्न लुक केलेल्या शितलला आता विनोदी भूमिका तेही गावरान लेहज्यात साकारायची आहे. त्यामुळे तिचा कस लागणार आहे. याबाबत बोलताना शितल म्हणते की, “विनोदी भूमिका साकारणं भल्याभल्यांना कठिण जातं. त्यात हा माझा प्रांत नाही. त्यातही कॉमेडीचा किंग भाऊ कदम माझ्या समोर म्हटल्यावर थोडंसं दडपण आलंच. पण भाऊंनी सांभाळून घेतलं. काशी ही भूमिका माझ्यासाठी स्मरणात राहिल अशीच आहे. प्रेक्षकांनी आतापर्यंत मला मॉडर्न रुपात पाहिलं आहे. आता त्यांना गावरान ठेका पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात शितल आणि भाऊ कदम व्यतिरीक्त विजय पाटकर, भारत गणेशपुरे यांसारखे दमदार कलाकारही दिसणार आहेत. या सिनेमाची खासियत म्हणजे हा सिनेमा दादा कोंडके शैलीतला आहे. यात प्रेक्षकांना गावरान भाषेचा लेहजा पाहायला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.