‘या’ कारणामुळं मुलाच्या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजला सनी देओल होता ‘गैरहजर’ !

0

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 –  गुरुवारी देओल कुटुंबातील तिसर्‍या पिढीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनी देओल यांचा मुलगा करण देओलचा डेब्यू फिल्म पल पल दिल के पासचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून सनी देओल बॉलीवूडमध्ये मुलगा करणला लाँच करीत आहे.  प्रत्येक प्रमोशनल कार्यक्रमात तो मुलांबरोबर दिसतो. पण ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये सनी देओल अनुपस्थित होता. कारण काय आहे ते जाणून घ्या

पल पल दिल के पासच्या ट्रेलर लॉन्चवेळी धर्मेंद्र आपल्या नातवाला पाठिंबा देण्यासाठी आला होता. चित्रपटाची नायिका सहर बाम्बा देखील तेथे हजर होती. पण तिथे उपस्थित माध्यमांचे डोळे सनी देओलच्या शोधात होते. करण देओलने या कार्यक्रमात आपले वडील न येण्याचे कारण उघड केले. त्यांनी मीडियाला सांगितले की त्याचे वडील बटाला फॅक्टरी स्फोटग्रस्तांना भेटण्यासाठी गुरदरपूरला गेले आहेत, त्यामुळे येथे येऊ शकले नाहीत.

करण म्हणाला, कारण गुरदासपुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे.” त्यामुळे माझे वडील या कार्यक्रमाचा भाग होऊ शकले नाहीत. पीडितांच्या कुटुंबीयांना सहानुभूती संपूर्ण टीमकडून त्यांच्यासाठी प्रार्थना करणने या वेळी व्यक्त केली. तो म्हणाला, ते आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी गेले आहेत. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे,  म्हणून आता काम पुढे नेण्याची माझी जबाबदारी आहे.

पंजाबमधील गुरदासपूर येथील बटाला येथील बेकायदा फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. ज्यामध्ये सुमारे 23 जण ठार झाले. काही लोक जखमीही झाले आहेत. सनी देओल हे गुरदासपूरचे खासदार आहेत, म्हणूनच त्यांना या बातमीची माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी निघून गेले. दुसरीकडे, करण देओलचा पहिला चित्रपट 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपट एक रोमँटिक कहाणीवर आधारित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.