‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी
एन पी न्यूज २४ ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी जपानीज वॉटर थेरेपीचा वापर केला जातो. यामध्ये विशिष्ट पद्धतीने पाणी प्यायचे आहे. यामुळे अनेक आरोग्य समस्या सुद्धा दूर होतात. या थेरेपीत दिवसभरात पाणी कधी व किती प्यावे, जेवणाच्या वेळा हे महत्वाचे आहे. या थेरेपीमध्ये पाणी पिण्याविषयी ५ गोष्टींकडे दिले पाहिजे. या ५ गोष्टी जाणून घेवूयात.
असा करा उपाय
१ सकाळी उठल्यावर चार ते सहा ग्लास पाणी प्या. पाणी थंड अथवा कोमट असू नये. नॉर्मल पाणी प्या.
२ पाणी प्यायल्यानंतर ब्रश करा. त्यानंतर पंचेचाळीस मिनिटे काहीही खावू नका.
३ दिवसभरात काहीही खाल्ल्यानंतर दोन तासांपर्यंत पाणी पिऊ नका.
४ ठराविक अंतराने थोडे-थोडे पाणी पित रहा.
५ वय कमी असेल तर कमी पाण्याने सुरूवात करावी. नंतर प्रमाण वाढवावे.
हे आहेत फायदे
* हाय बीपीचा त्रास दूर होतो.
* आर्थरायटिसमध्ये फायदा होतो.
* शरीरातून टॉक्सिन्स बाहेर येतात आणि मेटॉबॉजिज्म चांगले राहते.
* डायजेशन सिस्टीम ठीक होते.
* वजन कमी करण्यास मदत होते.
* डायबिटीजमध्ये मदत होते.