कारची तोडफोड करत ‘या’ अभिनेत्रीची लाखोंची बॅग दिवसाढवळ्या ‘लंपास’

jenna-dewan
31st August 2019

मुंबई : वृत्तसंस्था – हॉलिवूडमधील प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस जेना दिवान (jenna dewan) ला एका विचित्र प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. तिच्या महागड्या बॅगची चोरी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र या बॅगच्या चोरीची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दिवसाढवळ्या घडला आहे.

चोरट्यांनी जेनाच्या कारची तोडफोड करत तिची महागडी बॅग लंपास केली. तिच्या या बॅगची किंमत 3000 डॉलर्स म्हणेजच 2.5 लाख रुपये इतकी होती. सेंट लॉरेंट बॅग जेनासाठी मौल्यवान गोष्ट होती.


एका वृत्तानुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास ही चोरीची घटना घडली आहे. जेनाने आपली कार लॉस एंजेलिस येथील सनसेट स्ट्रीटवर पार्क केली होती. यावेळी तिच्या बॅग चोरीला गेली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काऊंटी शेरीफ भागातील स्थानिक पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेनाचा प्रियकर स्टीव्हसुद्धा याठिकाणी लगेचच हजर झाला होता.

सेलिब्रिटींसोबत अशा घटना नेहमीच घडत असतात. याआधीही सेलेब्रिटींवर हल्ले आणि त्यांच्या महागड्या वस्तू लंपास करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. हॉलिवूडच नाही तर बॉलिवूडमध्येही अशा घटना समोर आल्या आहेत. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मल्लिका शेरावतलाही अशाच घटनेचा सामना करावा लागला आहे.