काश्मीर हा अंतर्गत मुद्दा, पाकिस्ताननं गप्प बसावं ! राहुल गांधींचं ‘डॅमेज कंट्रोल’

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ माजला आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये या विषयावरून दिलेल्या निवेदनामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा उल्लेख केल्याने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून आता राहुल गांधी यांनी ट्विट करत पाकिस्तानला फटकारले आहे.

या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे कि, इतर मुद्द्यावर केंद्र सरकारशी जरी मतभेद असले तरीही काश्मीरच्या मुद्द्यावर मात्र सरकारला पाठिंबा आहे. त्याचबरोबर काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हणत कुणीही यामध्ये दखल देण्याची गरज नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिले कि, जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसा होत आहे. कारण पाकिस्तानमधील लोकं त्यांना भडकावत असून दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी 

केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची सभा झाल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते कि, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तिथे सर्व चुकीचे घडत असून मोठ्या प्रमाणावर नागरिक मारले जात आहेत. त्यांच्या याच विधानाला पकडून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात भारतावर आरोप केले होते. त्यानंतर आता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, याआधी देखील पाकिस्तानने या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रात देखील हा मुद्दा उचलून धारला होता. मात्र चीन सोडून त्यांना कोणत्याही राष्ट्राने या मुद्द्यावर समर्थन दिले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.