64 लाखांचा घोटाळा : माजी जि. प. सदस्यासह तत्कालीन व विद्यमान सरपंच, ग्रामसेवक ‘गोत्यात’, झाला FIR

0

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार ग्रामपंचायतीमध्ये ६४ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आझाद ठुबे यांच्यासह विद्यमान व तत्कालीन सरपंच, पाच ग्रामसेवकांविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी दाखल गुन्ह्यात काल सायंकाळी पंचायत समितीचा विस्तार अधिकाऱ्यांनी पुरवणी जबाब दिल्यानंतर आरोपींचा समावेश करण्यात आला आहे.

आरोपींमध्ये तत्कालीन सरपंच श्रीमती कमल लक्ष्मण शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद प्रभाकर ठुबे, कार्यरत सरपंच अलंकार अहिलाजी काकडे (तिन्ही रा. कान्हूरपठार, ता. पारनेर), तत्कालीन
ग्रामविकास अधिकारी के. एस. सोनवणे, एन. के. शिंदे, एस.बी.नरसाळे, के.एन.भगत, कार्यरत
ग्रामविकास अधिकारी बी. पी. काळापहाड यांचा समावेश आहे.

याबाबत विस्तार अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कान्हूरपठार येथील सन १९९८-९९ ते सन २०११-१२ या कालावधीतील स्थानिक निधी लेखापरीक्षनामध्ये पूर्तता झालेल्या ३१० ऑडीट शंकामध्ये संबधितांनी ग्रामपंचायत कान्हूरपठार येथील ग्रामनिधीमध्ये ६ लाख २८ हजार ५६३ रुपयांचा भरणा केलेला आहे. तत्कालीन सरपंच श्रीमती कमल लक्ष्मण शेळके, आझाद प्रभाकर ठुबे, कार्यरत सरपंच अलंकार अहिलाजी काकडे व आणखी पाच ग्रामविकास अधिकार्‍यांनी ग्रामपंचायत कान्हूरपठार येथील ग्रामनिधीमध्ये अपहार रक्कम भरल्याने संबधितांवर ठेवलेले दोषारोप त्यांना मान्य केल्याचे वाटते.

अपहार झालेची ती एक प्रकारे कबुलीच आहे. उर्वरित अपहार रक्कम आक्षेपाधीन ६४ लाख ५० हजार १८२ रुपयांबाबत पूर्तता झालेली नाही. या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.