PM Kisan Yojana | फक्त 3 दिवसांची प्रतीक्षा…कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येतील 2000 रुपये, पीएम मोदी करतील जारी

0

नवी दिल्ली : PM Kisan Yojana | तुम्ही सुद्धा केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. होय, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर ताबडतोब किसान सन्मान निधीसंबंधी फाईलवर सही केली होती. आता हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा येतील, याबाबत माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदी किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी करणार आहेत.

हे पैसे १८ जून (मंगळवार) ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. म्हणजे आजपासून तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील. पंतप्रधान मोदी १८ जून रोजी त्यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीचा दौरा करणार आहेत. या एक दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान शेतकरी संमेलनाला संबोधित करतील आणि १७ वा हप्ता जारी करतील.

या अंतर्गत ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २०००० कोटीची रक्कम पाठवली जाईल. आसामचे सीएम हिमंत बिस्वा सरमा यांनी अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, आसामच्या १७.५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.