Gautam Adani | गौतम अदानी यांनी खरेदी केली आणखी एक सीमेंट कंपनी, 10442 कोटीत डील फायनल; काय आहे पूर्ण प्‍लान?

0

नवी दिल्ली : Gautam Adani | सीमेंट इंडस्ट्रीत अदानी ग्रुपचा दबदबा सातत्याने वाढत आहे. आता अदानी फॅमिलीची सीमेंट कंपनी अंबुजा सीमेंट्सने (Ambuja Cement) पेना सीमेंट (Penna Cement) इंडस्ट्रीजचा करार केला आहे. ही डील १०,४४२ कोटी रुपयांत झाली आहे. या डिलसोबत अंबुजा सीमेंट साऊथ इंडियात आपला बिझनेस वाढवण्याचा प्‍लान करत आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये अदानी ग्रुपकडून अंबुजा सीमेंट खरेदीनंतर हा कंपनीचा चौथा मोठा बिझनेस करार आहे. हैदराबाद बेस्‍ड पेना सीमेंटचे प्रमोटर पी प्रताप रेड्डी आणि त्यांचा परिवार आहे. या ग्रुपचे सीमेंटचे वार्षिक उत्पादन १४ मिलियन टन आहे, ज्यामध्ये आता ४ मिलियन टन सीमेंट बनविण्याची फॅक्ट्री तयार होत आहे. अंबुजा सीमेंटकडून पेना कंपनी खरेदी करण्यासाठी आपल्या जमा केलेल्या पैशाचा वापर करेल. यातून साऊथ इंडियामध्ये अंबुजा सीमेंटची भागीदारी ८% वाढेल.

ही डील काही महिन्यांपूर्वी मार्केटची लीडर कंपनी अल्ट्रा टेक सीमेंटकडून केसोराम इंडस्ट्रीजच्या बांधकाम साहित्य कारखाने खरेदी केल्यानंतर झाली आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत अंबुजा सीमेंटच्या जवळ २४,३३८ कोटी रुपये रोख होते. यामध्ये अदानी कुटुंबाकडून ८,३३९ कोटीच्या वॉरंटी रक्कमेचा सुद्धा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.