Malshej Ghat Accident | माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली; चुलता- पुतण्याचा जागीच मृत्यू

0

Malshej Ghat Accident | कल्याण-नगर महामार्गावर (Kalyan Nagar Road) माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घाटातील गणेश मंदिराजवळ घडली आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत चुलता-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई येथे राहत असणारे कुटुंब रिक्षातून आपल्या मूळ गावी नगर जिल्ह्यातील संगमनेर हद्दीतील चंदनापुरीला येत असताना ही घटना घडली.

राहुल भालेराव (वय 37) आणि त्याचा पुतण्या स्वयंम भालेराव (वय 6) अशी मृतांची नावे आहेत. तर बाजूलाच बसलेली आई विमल भालेराव (वय 58), वडील बबन भालेराव वय (वय-62) व भाऊ सचिन भालेराव (वय 40, सर्व रा. घाटीपाडा नं. 2 वाळकाबाई चाळ, बिहार रोड, योगीहील, मुलुंड, प. मुंबई ) हे थोडक्यात बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील भालेराव कुटुंब आपल्या रिक्षा (एमएच 03 डी.एस.3211) मधून चंदनापुरी येथे मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी निघाले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. माळशेज घाटातून प्रवास करत असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रिक्षावर दरड कोसळली. यात मुलगा व नातवाचा आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह ओतूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.