Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | पुणे : पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालसह भावावर मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

0

पुणे : – Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (Vishal Surendra Kumar Aggarwal) व त्याच्या भावावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. 2007 साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रह्मा सोसायटी (Nancy Brahma Society) धारकांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी अगरवाल बंधूसह पाच जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 71 सोसायटी धारकांना पार्किंग, मोकळी जागा देणे बंधनकारक असताना तीन सोसायटी तयार करुन एकाच ठिकाणी अँमिनीटी स्पेस व मोकळी जागा दर्शवून सोसायटी धारकांची परवानगी नसताना बिल्डरने वॅन्टेज टॉवर ही 11 मजली आणि वॅन्टेज हाय ही 10 मजली इमारत बांधून फसवणूक केली

याप्रकरणी विशाल अरुण अडसूळ (वय-42 रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडंसी को. ऑ. हौसिंग सोसायटी, बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, राम कुमार अगरवाल (Ram Kumar Aggarwal), विनोद कुमार अगरवाल (Vinod Kumar Aggarwal), नंदलाल किमतानी, अशिष किमतानी व इतरांवर आयपीसी 420, 409, 34 सह मोफा कायदा (MOFA Act) कलम 3, 7, 11, 13 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2007 साली बावधन येथे बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रह्मा को. ऑप. हौ. सोसायटी मध्ये 71 जणांनी फ्लॅट घेतला होता. याच सोसायटीच्या मालकीची त्याठिकाणी पार्किंग आणि अँमीनीटी स्पेस, मोकळी जागा आहे. मात्र, एकाच ठिकाणची जागा वेगवेगळ्या नकाशावर दर्शवून नकाशात फेरबदल करुन तसे नकाशे मंजूर करुन घेतले.

नॅन्सी ब्रह्मा सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी नसताना बिल्डर विशाल अगरवाल यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करुन सोसायटीच्या जागेवर 11 मजली इमारतीत 66 कमर्शियल ऑफिस बांधले तर 10 मजली इमारतीत 27 सदनिका आणि 18 शॉप्स बांधून नॅन्सी ब्रह्मा को. ऑप. हौ. सोसायटी. ली. सोसायटी धारकांचा विश्वासघात करुन फसवणूक केली. विशाल अडसूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल अगरवाल व त्याच्या भावांसह इतरांवर महाराष्ट्र ओनरशिप अॅक्ट (मोफा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ (API Somnath Panchal) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.