IAS Officer’s Daughter Suicide | मुंबई : IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, मंत्रालयासमोरील घटना

0

मुंबई : – IAS Officer’s Daughter Suicide | मुंबईमध्ये एका सनदी अधिकाऱ्याच्या (IAS) मुलीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. आयएएस अधिकारी विकास रस्तोगी (Vikas Rastogi) यांच्या मुलीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मंत्रालयासमोर (Mumbai Mantralaya) असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन मुलीनं आयुष्य संपवल. मुलगी वकीलीचे शिक्षण घेत होती.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, लिपी रस्तोगी Lipi Rastogi (वय-27) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहेत. तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. परंतु, या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्य़रत आहेत. लिपी रस्तोगीने दहाव्या मजल्यावरुन उडी मारली तेव्हा खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली. यामध्ये गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

लिपी रस्तोगी ही LLB करत होती. तिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे समजते. मात्र, त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. ही धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Cuffe Parade Police) घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या मुलीची आई राधिका रस्तोगी (Radhika Rastogi) या चलन विभागात सचिव आहेत.

मुंबई मंत्रालयासमोर सुनीती नावाची इमारत आहे. याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत लिपी रस्तोगी हिने आत्महत्या केली. या इमारितीमध्ये आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. पहाटे तीनच्या सुमारास तीने उडी मारुन आयुष्य संपवलं. तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.