Builder Vishal Surendrakumar Agarwal | अगरवाल विरोधात आणखी एका महिलेची तक्रार; जमीन हडपल्याचा केला आरोप (Video)

0

पुणे: Builder Vishal Surendrakumar Agarwal | कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे (Porsche Car Accident Pune) . या अपघात प्रकरणाबाबत कारवाई करीत असताना पुणे पोलिसांनी (Pune Police) अगरवाल कुटुंबाबाबत काही तक्रारी असतील तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी देण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार शिवसेना नेते अजय भोसले (Ajay Bhosale) यांनी तक्रार दिली होती. त्यात २००९ साली गोळीबार केल्याचाही आरोप आहे. शिवसेनेच्या नेत्याला मारण्यासाठी सुपारी दिली होती अशीही माहिती आहे. अगरवाल कुटुंबियाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सुरेंद्र अगरवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन होते, अशी माहिती तक्रारीतून पोलिसांना मिळाली,

यांनतर अगरवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी दुसरा तक्रारदार पुढे आला. दत्तात्रेय कातोरे असे त्यांचे नाव आहे. आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय कातोरे यांनी केला आहे.

आता या आरोपांनंतर अगरवाल कुटुंबियांच्या विरोधात तिसरी तक्रारही समोर आलेली आहे. एका महिलेने पुढे येऊन अगरवाल कुटुंबीयांवर जमीन हडपल्याचा आरोप केला आहे. वडगाव शेरी (Vadgaon Sheri) भागातील नीता गलांडे (Neeta Galande) यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात (Pune CP Office) येऊन अगरवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गलांडे यांच्या १० एकर जागेवर अगरवाल कुटूंबाने बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. तसेच, याबाबत पोलिसात तक्रार करुनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

अगरवाल कुटुंबियांच्या विरोधात येत असलेल्या तक्रारींमुळे त्यांच्या अडचणीत आणखी मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.