Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघातानंतर कोर्टात आजोबांनी दिली होती गॅरंटी, माझा नातू अभ्यासात लक्ष देईल, वाईट संगतीपासून दूर राहील

0

पुणे : Porsche Car Accident Pune | पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या (Builder In Pune) अल्पवयीन मुलाने पोर्शे कार भरधाव चालवून दोघांचा बळी घेतला. या प्रकरणात पुणे पोलीस (Pune Police) आणि न्यायालयाच्या भूमिकेमुळे (Pune Court) देशभरात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात अवघ्या १५ तासांत अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला. आता न्यायाधीशांनी कोणत्या आधारावर जामीन दिला? याबाबत आता चर्चा होत आहे.

अल्पवयीन आरोपीला जामीन मिळण्यासाठी त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल (Surendra Kumar Agarwal) यांनी कोर्टात हमी दिली की, माझा नातू वाईट संगतीपासून दूर राहील आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीय करेल. यानंतर जामीन मंजूर करण्यात आला.

अल्पवयीन आरोपीला न्यायाधीश यांच्यासमोर हजर केले होते. यावेळी त्याचे वकील प्रशांत पाटील (Adv Prashant Patil) यांनी घडलेली घटना दुर्दैवी असली तरी जी कलमे लावण्यात आली आहेत, त्यामध्ये आरोपीला जामीन मिळण्याची तरतूद असल्याचे सांगितले. न्यायालयाने ही बाब तात्काळ मान्य करुन अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला.

विशेष म्हणजे अल्पवयीन आरोपी अपघातावेळी दारू प्यायल्याचे प्रथमदर्शनी दिसत असूनही पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट अद्याप आला नसल्याचे कारण दिले आहे. तसेच आरोपीने दारू प्यायल्याची बाब पोलिसांनी न्यायालयाच्या समोर आणली नाही.

भरधाव कार चालवून दोघांचा जीव घेतलेल्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातलेल्या अटी अतिशय आश्चर्यचकारक आहेत.

न्यायालयाने जामीन या आधारावर दिला…

  • अल्पवयीन आरोपी पुराव्यांशी छेडछाड करणार नाही, पळून जाणार नाही, अशी वकीलांनी हमी दिली.
    अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी माझ्या नातवाला वाईट संगतीपासून दूर ठेवण्याची हमी दिली.
  • आरोपी अभ्यासावर लक्ष केंद्रीय करेल, अशी हमीदेखील आरोपीच्या आजोबांनी दिली.
  • अल्पवयीन आरोपीला पंधरा दिवस वाहतूक पोलिसासोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे लागेल.
  • अल्पवयीन आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील.
  • अल्पवयीन आरोपीला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.
Leave A Reply

Your email address will not be published.