PM Modi Road Show In Mumbai | आमच्या मतदारसंघात पण रोड शो घ्या, शिंदे गटाच्या उमेदवारांची मागणी अमान्य, फक्त भाजपाच्या मिहिर कोटेचांसाठीच मोदी येणार

मुंबई : PM Modi Road Show In Mumbai | आज सायंकाळी पंतप्रधान मोदी यांचा ईशान्य मुंबई मतदार संघातील (
North East Mumbai Lok Sabha Constituency) भाजपा उमेदवार मिहिर कोटेच्या (Mihir Kotecha) यांसाठी घाटकोपरमध्ये रोड शो (Ghatkopar Road Show) होणार आहे. दिंडोरी (Dindori Lok Sabha) आणि कल्याणमधील (Kalyan Lok Sabha Constituency) जाहीर सभेनंतर मोदी मुंबईसाठी प्रयाण करतील. दरम्यान मुंबईतील महायुतीच्या सहाही उमेदवारांसाठी (Mahayuti Candidate) त्यांच्या मतदार संघात पंतप्रधान मोदींनी रोड शो करावा अशी मागणी उमेदवारांनी केली होती. मात्र, ही मागणी अमान्य करण्यात आली असून आता केवळ घाटकोपरमध्ये मिहिर कोटेच्यांसाठी मोदींचा रोड शो होणार आहे.
आज सायंकाळी घाटकोपर पश्चिममधील एलबीएस मार्गावर अशोक सिल्क मिलपासून घाटकोपर पूर्व येथील पाश्र्वनाथ मंदिरापर्यंत सुमारे अडीच किमी अंतरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. या रोड शोसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार, मंत्री, शहरातील सर्व आमदार-खासदार व अन्य पदाधिकारी रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत.
दरम्यान, भाजपा नेत्यांनी दावा केला आहे की, या रोड शोमुळे मुंबईतील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती होईल.
मोदी केवळ घाटकोपर म्हणजे मिहिर कोटेचा उमेदवार असलेल्या मतदारसंघातील एका भागाचा दौरा करणार आहेत. मुंबईतील सहा जागांपैकी तीन जागा भाजप आणि तीन जागा शिंदे गट लढत आहेत.
मोदी यांचा रोड शो आपल्या तीन मतदारसंघात व्हावा, असा शिंदे गटाचा आग्रह होता. पण शिंदे गटाच्या उमेदवारांची ही मागणी अमान्य झाली आहे. दरम्यान, १७ मे रोजी पंतप्रधान मोदी यांची शिवाजी पार्क (Shivaji Park Mumbai) येथे सभा होणार आहे.