Pune Railway Station | पुणे रेल्वे स्थानकातील दुकानात भरदिवसा मद्यपान, RPF कडून कारवाई

0


पुणे : – Pune Railway Station | रेल्वेमध्ये आणि रेल्वे स्थानक परिसरात मद्यपान करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, या कायद्याला पुणे रेल्वे स्थानकताली एका दुकानदाराने केराची टोपली दाखल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे रेल्वे स्थानकावर भाड्याने घेतलेल्या दुकानात भरदिवसा मद्यपान करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Drinking Wine at a shop in Pune railway station, action by RPF)

पुणे रेल्वे स्थानकावर असलेल्या अंब्रेला छत्री गेटलगत एका दुकानदाराला रेल्वे प्रशासनाने जागा भाड्याने दिली आहे. मात्र, या दुकानदाराने प्रवाशांच्या येण्या-जाण्याची तमा न बाळगता दुकानात बसून मद्यपान करण्यास सुरुवात झाली. याचा फोटो सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला. त्यानंतर प्रवासी संघटनेने याचा तिव्र निषेध व्यक्त केला.

यासंदर्भात आरपीएफ अधिकारी म्हणाले, संबंधित दुकानदाराबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही त्याल याबाबत विचारणा केली असता, त्याने मद्यपान केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर रेल्वे सुरक्षा कायदा कलम 145 नुसार कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.