Pune Crime News | पुणे शहरात अलेक्झांड्रिन पोपटांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

0

पुणे : – Pune Crime News | पुणे शहरामध्ये अलेक्झांड्रिन पोपटांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना पुणे वन विभागाच्या (Pune Forest Department) पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून दोन पोपट जप्त करण्यात आले आहेत. वन विभागाच्या पथाने ही कारवाई रविवारी (दि.31) पुणे औंध येथील लोहिया आय. टी.पार्क (Lohia IT Park) जवळ कली.

पियूष दत्तात्रये पासलकर (वय 21 रा. कर्वेनगर), यश रमेश कानगुडे (वय 21 रा. वारजे, कर्वेनगर), सौरव कोंडिबा झोरे (वय 19 रा.वारजे, कर्वेनगर) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

पुणे औंध येथील लोहिया आय. टी.पार्क जवळ तीन जण अलेक्झांड्रिन पोपटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना समजली. त्यानुसार बनावट ग्राहक बनून अधिकाऱ्यांनी सापळा रचला. बेकायदेशीररित्या पोपटांची विक्री करताना तिघांना अटक केली.

ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गर्शनाखाली वनक्षेत्रपाल भांबुर्डा सपकाळ वनरक्षक हाके व टीमने केली. मानद वन्यजीव रक्षक, सातारा रोहन भाटे यांनी सहकार्य केले.

अलेक्झांड्रिन पोपट हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत परिशिष्ट 2 भाग ब मध्ये येतात. पोपटाला बाळगणे, पकडणे, विक्री करणे, शिकार करणे, पाळणे हे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्याना सात वर्ष कारावास व 10 हजार रुपये दंड अशी कायद्यात तरतूद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.