Pune Pashan Crime | पुणे : पाठलाग करुन लग्नाची मागणी, अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन करुन विनयभंग

0

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pashan Crime | किराणा दुकानात सामान खरेदी करुन घरी परत जाणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात आडवून तिच्याकडे लग्नाची मागणी करुन गैरवर्तन करुन विनयभंग केला (Molestation Case). हा प्रकार मंगळवारी (दि.26) सकाळी अकराच्या सुमारास पाषाण येथे घडली. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत (POSCO Act) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या 40 वर्षाच्या आईने गुरुवारी (दि.28) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बालाजी कांबळे (वय-22 रा. पाषाण गाव) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी ही घराजवळ असलेल्या किराणा दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. सामान घेऊन घरी येत असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन रस्त्यामध्ये आडवले. तिच्याकडे लग्नाची मागणी करुन तिला आपल्याकडे ओढून गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील (PSI Shamal Patil) करीत आहेत.

अश्लील स्पर्श करुन महिलेचा विनयभंग

हडपसर (Hadapsar) : महिलेच्या घरात घुसून अश्लील शिवीगाळ केली. तसेच रस्त्याने पायी जात असताना हाताला अश्लील स्पर्श (Bad Touch) करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. ही घटना 22 मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास काळे पडळ (kalepadal) येथे घडली आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन निखील नाझरे याच्यावर आयपीसी 354, 427, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.