Supriya Sule To Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी जावे; सुप्रिया सुळे यांचा टोमणा

0

पुणे: Supriya Sule To Devendra Fadnavis | मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम, भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवून टाकावा, असे आव्हान बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. दिल्लीला एकदा आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी जावे, असा टोमणा सुध्दा मारला.

सुळे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित झाली आहे. एका गावदौऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस हेही बारामतीत येणार आहेत. बारामतीमध्ये प्रचारासाठी येणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करताना त्यांनी अतिथी देवो भव… म्हणत त्यांचं बारामतीमध्ये स्वागतच आहे, असे म्हटले.

उपरोधिक टीका करताना सुळे म्हणाल्या ” फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढावा. एखादे दोन नोकरीचे मोठे प्रकल्प येथे आणावेत. सिलेंडरचा भाव कमी करावा.‌ शेतकऱ्यांना हमी भाव त्यांनी द्यावा. ”

महायुतीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न होत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उमेदवार जाहीर करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई होत आहे. अजित पवार यांच्या विरोधातही महायुतीतील काही नेते मैदानात उतरले आहेत. दौंड मतदारसंघातून विजय शिवतारे तर इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.