Pimpri Drug Case | पिंपरी : एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पिंपरी : – Pimpri Drug Case | पिंपरी चिंचवड परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज विक्री (MD Drugs) करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pimpri) अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एमडी ड्रग्ज, दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रावेत हाय स्ट्रीट (Ravet High Street) वरील डी मार्ट (D Mart Ravet) जवळील मैदानाच्या बाजूला केली. (Pune Pimpri Chinchwad Crime)

याबाबत पोलीस शिपाई सदानंद विजय रुद्राक्षे (वय-36) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रोहित सुरत सिंह Rohit Surat Singh (वय-27 रा. आकुर्डी स्टेशन, आकुर्डी) याच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्टनुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक रावेत पोलीस ठाण्याच्या (Ravet Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत होते. (Pimpri Crime Branch)

त्यावेळी डी मार्ट शेजारी असलेल्या मैदानात एक तरुण दुचाकीवर थांबला असून तो एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आरोपीला शिताफिने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे 24 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून ड्रग्ज, दुचाकी व मोबाईल असा एकूण 3 लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.