Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा ! नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक, गरूड स्ट्रायकर्स संघांची विजयी कामगिरी

0

पुणे : Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत नादब्रह्म सर्ववादक, रंगारी रॉयल्स्, दगडुशेठ वॉरीयर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, श्री राम पथक आणि गरूड स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या (LR Shinde High School Group) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नादब्रह्म सर्ववादक संघाने सलग दोन विजय मिळवण्याची कामगिरी केली. आज सकाळी झालेल्या सामन्यात रोहन पवार याच्या नाबाद ५४ धावांच्या जोरावर नादब्रह्म सर्ववादक संघाने नादब्रह्म ड्रमर्सचा ९ धावांनी पराभव केला. दुसर्‍या सामन्यात नादब्रह्म सर्ववादकने तुळशीबाग टर्स्कस्चा ८ गडी राखून सहज पराभव केला. या सामन्यामध्ये रोहन पवार याची अष्टपैलु कामगिरी निर्णायक ठरली.

हरनीष दाणी याच्या कामगिरीच्या जोरावर रंगारी रॉयल्स् संघाने तुळशीबाग टर्स्कस्चा ५७ धावांनी सहज पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रंगारी रॉयल्स्ने १०३ धावांचे आव्हान उभे केले. हरनीष दाणी (३४ धावा), कैलास व्यास (नाबाद २४ धावा), सुजीत धुमाळ (नाबाद १८ धावा) आणि गौरव निधाळकर (१६ धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या लक्ष्याचा पाठलाग करताना तुळशीबाग टर्स्कस्चा डाव ४६ धावांवर मर्यादित राहीला.

अभिजीत काटवटे याच्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर श्री राम पथक संघाने कसबा सुपरकिंग्ज्चा ३८ धावांनी पराभव केला. महेश परदेशी याच्या अचूक गोलंदाजीमुळे जोगेश्वरी जॅग्वॉर्स संघाने कसबा सुपरकिंग्ज्चा ७ गडी राखून पराभव करत विजयी कामगिरी केली. मयांक गुप्ता याच्या अष्टपैलु खेळीमुळे महालक्ष्मी मॅव्हरीक्स् संघाने युवा योद्धाज् संघाचा ८ गडी राखून पराभव केला.

कपिल राऊत याच्या ६१ धावांच्या जोरावर दगडुशेठ वॉरीयर्स संघाने जोगेश्वरी जॅग्वॉर्स संघाचा १८ धावांनी पराभव करून आगेकूच केली. विशाल गुलमे याच्या अष्टपैलु खेळीमुळे गरूड स्ट्रायकर्सने मिडीया रायटर्स संघावर १० गडी राखून एकतर्फी विजय मिळवून आगेकूच केली.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

मिडीया रायटर्सः ८ षटकात ७ गडी बाद ५२ धावा (अलि शेख २४, विशाल गुलमे ३-११, वरद चिल्लई १-५) पराभूत वि. गरूड स्ट्रायकर्सः ५ षटकात बिनबाद ५३ धावा (विशाल गुलमे नाबाद २७, चैतन्य शहा नाबाद १८); सामनावीरः विशाल गुलमे;

दगडुशेठ वॉरीयर्सः ८ षटकात ७ गडी बाद ९१ धावा (कपिल राऊत ६१ (२४, ४ चौकार, ५ षटकार), अजिंक्य मोझार ८, समीर काळे २-१९) वि.वि. जोगेश्वरी जॅग्वॉर्सः ८ षटकात ७ गडी बाद ७३ धावा (अमित झरकर ३०, समीर काळे १२, विश्व परदेशी ३-१७, प्रकाश चव्हाण २-१६); सामनावीरः कपिल राऊत;

श्री राम पथकः ८ षटकात ५ गडी बाद ८८ धावा (अभिजीत काटवटे ४१, कुणाल श्रोत्री १८, सत्यजीत वाईकर २-१९) वि.वि. कसबा सुपरकिंग्ज्ः ८ षटकात ६ गडी बाद ५० धावा (सचिन पै नाबाद १४, वरद ठाकर १०, अभिजीत काटवटे १-६); सामनावीरः अभिजीत काटवटे;

नादब्रह्म सर्ववादकः ८ षटकात ४ गडी बाद ७८ धावा (रोहन पवार नाबाद ५४ (२४, ४ चौकार, ४ षटकार), प्रतिक खांडवे १२, श्रेयांक जैन २-१८) वि.वि. नादब्रह्म ड्रमर्सः ८ षटकात ८ गडी बाद ६९ धावा (पार्थ नाईकुडे २०, श्रेयस भंडारी १२, हरीष गोयल २-१६, संकेत कंद २-१८, रोहन पवार २-१९); सामनावीरः रोहन पवार;

रंगारी रॉयल्स्ः ८ षटकात ३ गडी बाद १०३ धावा (हरनीष दाणी ३४, कैलास व्यास नाबाद २४, सुजीत धुमाळ नाबाद १८, गौरव निधाळकर १६) वि.वि. तुळशीबाग टर्स्कस्ः ८ षटकात ६ गडी बाद ४६ धावा (साई डोगरे २३, कुणाल चव्हाण २-२); सामनावीरः हरनीष दाणी;

कसबा सुपरकिंग्ज्ः ८ षटकात २ गडी बाद ५४ धावा (नचिकेत देशपांडे ३४, महेश परदेशी २-७) पराभूत वि. जोगेश्वरी जॅग्वॉर्सः ७ षटकात ३ गडी बाद ५५ धावा (समीर काळे २३, जनगीद प्रसाद १४, गिरीष हसबनीस १-१२); सामनावीरः महेश परदेशी;

युवा योद्धाज्ः ८ षटकात ४ गडी बाद ३४ धावा (विदयुत पगारे ११, मयांक गुप्ता १-२, ओंकार पैलवान १-३) पराभूत वि. महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ः ३.२ षटकात २ गडी बाद ३७ धावा (मयांक गुप्ता नाबाद १७, विवेक जांभुळकर ९, विनायक शेडगे २-२०); सामनावीरः मयांक गुप्ता;

तुळशीबाग टर्स्कस्ः ८ षटकात ७ गडी बाद ४७ धावा (साई डोगरे ११, संकेत कंद २-१०, रोहन पवार १-७) पराभूत वि. नादब्रह्म सर्ववादकः ४.४ षटकात २ गडी बाद ४८ धावा (रोहन पवार नाबाद २२, प्रतिक खांडवे १२, निखील टेकाळे १-१८); सामनावीरः रोहन पवार;

Leave A Reply

Your email address will not be published.