Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा; साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ब्लास्टर्स, मंडई मास्टर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, महालक्ष्मी मॅव्हरीक्स् संघांची विजयी वाटचाल !!

0

पुणे : Punit Balan Group (PBG) – Friendship Cup | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साई पॉवर हिटर्स, शिवमुद्रा ब्लास्टर्स, मंडई मास्टर्स, गुरूजी तालिम टायटन्स्, महालक्ष्मी मॅव्हरीक्स् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी करत आगेकूच केली.

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कुलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथमेश गोवलकर याच्या कामगिरीच्या जोरावर साई पॉवर हिटर्स संघाने गरूड स्ट्रायकर्सचा ३ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना गरूड स्ट्रायकर्सने ६६ धावांचे आव्हान उभे केले होते. साई पॉवर हिटर्सने ७ षटकात व ३ गडी गमावून हे लक्ष्य साध्य केले. नंतरच्या सामन्यात रूपक तुबाजी याच्या सर्वात वेगवान अर्धशतकाच्या जोरावर शिवमुद्रा संघाने मिडीया रायटर्सचा ६२ धावांनी सहज पराभव केला. दुसर्‍या एका सामन्यात निखील वाटणे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर साई पॉवर हिटर्सने शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला. निखील याने ८ धावात ३ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विवेक जांभुळकर याच्या कामगिरीच्या जोरावर महालक्ष्मी मॅव्हरीक्स् संघाने गुरूजी तालिम टायटन्स् संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. सुशांत मते याच्या ५२ धावांच्या जोरावर गुरूजी तालिम टायटन्स् संघाने युवा योद्धाज् संघाचा ५५ धावांनी सहज पराभव करून आगेकूच केली. ओंकार जोशी याच्या कामगिरीमुळे मंडई मास्टर्सने युवा योद्धाज् संघाचा ८ गडी राखून पराभव करत विजयी कामगिरी केली.

सामन्यांचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

गरूड स्ट्रायकर्सः ८ षटकात २ गडी बाद ६६ धावा (विशाल गुलमे ३६, योगेश कुंजीर नाबाद २३, प्रथमेश गोवलकर १-५) पराभूत वि. साई पॉवर हिटर्सः ७ षटकात ३ गडी बाद ६७ धावा (हुमेद खान नाबाद १८, नागेश अवघडे १४, आकाश इंदुलकर १३, योगेश कुंजीर २-१२); सामनावीरः प्रथमेश गोवलकर;

शिवमुद्रा ब्लास्टर्सः ८ षटकात १ गडी बाद ११० धावा (रूपक तुबाजी नाबाद ५६ (१८, ६ चौकार, ३ षटकार), रोहीत खिलारे २९, आदित्य अष्टपुत्रे २२, गोपाळ गुरव १-१६) वि.वि. मिडीया रायटर्सः ८ षटकात ८ गडी बाद ४८ धावा (शैलेश काळे १२, अलि शेख १६, हृषीकेश मोकाशी ४-६); सामनावीरः रूपक तुबाजी;

युवा योद्धाज्ः ८ षटकात ३ गडी बाद ६८ धावा (विनायक शेडगे ३७, शुभम भोसले १-१०) पराभूत वि. मंडई मास्टर्सः ७.३ षटकात २ गडी बाद ७४ धावा (ओंकार जोशी नाबाद ४८ (२२, ४ चौकार, २ षटकार), ऋषीकेश जगदाळे १५, अर्थव लांबट १-११); सामनावीरः ओंकार जोशी;

गुरूजी तालिम टायटन्स्ः ८ षटकात ७ गडी बाद ५५ धावा (सुशांत मते २७, सुशिल फाले नाबाद १०, राहूल साखरे २-१३, आदित्य पाठक २-४) पराभूत वि. महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ः ४.२ षटकात १ गडी बाद ५७ धावा (राहूल भिकाळे नाबाद २५, विवेक जांभुळकर नाबाद २४, सुशील फाले १-२६); सामनावीरः विवेक जांभुळकर;

शिवमुद्रा ब्लास्टर्सः ८ षटकात ६ गडी बाद ६१ धावा (रूपक तुबाजी २०, रोहीत खिलारे ११, निखील वाटणे ३-८) पराभूत वि. साई पॉवर हिटर्सः ७.३ षटकात ३ गडी बाद ६२ धावा (संजय काळोखे नाबाद ३१, केतन रामपुरे नाबाद २६, हृषीकेश मोकाशी २-१२); सामनावीरः निखील वाटणे;

गुरूजी तालिम टायटन्स्ः ८ षटकात २ गडी बाद १०८ धावा (सुशांत मते ५२ (२८, ३ चौकार, ४ षटकार), भावेश रच्चा नाबाद २५, अथर्व लांबट १-२३) वि. वि. युवा योध्दाज्ः ८ षटकात ६ गडी बाद ५३ धावा (सागर जगताप २३, सुशिल फाले २-२, मयुर परदेशी २-०); सामनावीरः सुशांत मते;

Leave A Reply

Your email address will not be published.