Vijay Shivtare On Ajit Pawar | विजय शिवतारेंची अजित पवारांवर जहरी टीका, हा विंचू अनेकांना डसलाय, आता तो महादेवाच्या पिंडीवर; अडचण अशी की… (Video)

0

बारामती : Vijay Shivtare On Ajit Pawar | हा विंचू अनेकांना डसला आहे, पण आता तो महादेवाच्या पिंडीवर मोदींकडे जाऊन बसला आहे. आता अडचण अशी झालीय, चप्पल मारावी तर महादेवालाही लागतेय आणि विंचवालाही मारता येत नाही. ही लोकांची भावना असून विंचूच्या रुपात असलेल्या फक्त अजित पवारच नव्हे तर या दोन्ही शक्तींचा बिमोड करायला पाहिजे, असे माझे प्रामाणिक मत आहे, अशी कठोर टीका शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा केली आहे. (Baramati Lok Sabha)

विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. यासंबंधी घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यामुळे संभाव्य उमेदवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या अडचणी वाढणार आहेत.

दरम्यान, शिवतारे हे सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत असल्याने महायुतीची मोठी गोची झाली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांचा समाचार घेतला.

विजय शिवतारे म्हणाले, माझ्यावर महायुतीच्या नेत्यांकडून दबाव येईल, मग मी निवडणुकीला उभे राहणार नाही, मी काहीतरी तडजोड करेन, असे अनेकांना वाटत होते. पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व नेत्यांना हात जोडून सांगतो, ही लढाई मला लढू द्या. ही धर्माची लढाई आहे, राजकारणाची स्वच्छता करायची असेल तर ही लढाई लढावीच लागेल.

विजय शिवतारे म्हणाले, कोणाला हरविण्यासाठी नाही तर घराणेशाही आणि झुंडशाही संपविण्यासाठी ही लढाई लढणार आहे. १ एप्रिल रोजी ५० ते ६० हजार लोकांची भव्य सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

माझ्याकडे कोणताही पक्ष नाही, फक्त सर्वसामान्य जनता आहे. १२ तारखेला दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि या पाशवी शक्तीचे १२ वाजविणार, असे आव्हान शिवतारे यांनी अजित पवारांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.