Pune Loni Kalbhor Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन लग्नाची मागणी, आईला धमकावणाऱ्या तरुणावर FIR

0

पुणे : – Pune Loni Kalbhor Crime | अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी घातली. याबाबत पीडित मुलीच्या आईने तरुणाला समजावून सांगितले असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली (Death Threats). याप्रकरणी लोणी काळभोर पोलीसांनी (Loni Kalbhor Police Station) 20 वर्षाच्या तरुणावर पोक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील पंधरा दिवसांपासून ते 8 मार्च या कालावधीत उरुळी देवाची (Uruli Devachi) येथे घडला आहे.(Pune Loni Kalbhor Crime)

याबाबत उरुळी देवाची येथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या पिडित मुलीच्या 40 वर्षाच्या आईने बुधवारी (दि.20) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन तेजस थोरात Tejas Thorat (वय-20 (रा. आदर्श नगर, देवाची उरुळी) याच्यावर आयपीसी 354(ड) सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्य़ादी यांच्या 17 वर्षाच्या मुलीचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिला लग्नाची मागणी घातली. याबाबत फिर्यादी यांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याला समजून सांगितले.

मात्र, आरोपीने मुलीचा पाठलाग करणे सुरुच ठेवले. मुलीचा घरापर्यंत पाठलाग करुन तिला मानसिक त्रास दिला. आरोपीने फिर्यादी यांना मी तुमच्या मुलीसोबत लग्न करणार आहे. तिचे जर दुसरीकडे लग्ने केले तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे (API Shivshant Khose) करीत आहेत.

विवाहितेचा पाठलाग करुन विनयभंग

खराडी (Kharadi) : मुलीला क्लासला सोडून घरी जाणाऱ्या विवाहित महिलेचा पाठलाग करुन विनयभंग
(Molestation Case) केल्याची घटना खराडी परिसरातील दुर्गामाता चौकाजवळ घडली आहे.
याप्रकरणी 34 वर्षाच्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police)
दिपक विष्णु वाकचौरे Deepak Vishnu Wakchore (वय-44 रा. साईनगरी, चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 16 मार्च रोजी सकाळी साडेसात आणि 19 मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे.

फिर्यादी महिला मुलीला क्लासला सोडून घरी येत असताना आरोपीने महिलेचा पाठलाग केला.
महिलेला गुड मॉर्निंग म्हणून मैत्री करण्याचा प्रयत्न केला.
तसेच रस्त्याने येता जाता पाठलाग करुन घरा समोर येऊन गाडीचा हॉर्न वाजवून चिठ्ठी दिली.
त्यामध्ये आरोपीने मोबाईल नंबर लिहून कॉल कर असे लिहून विनयभंग केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे (API Bhagwan Kamble) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.