Lok Sabha Election 2024 | पुणे: शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान जनजागृती

0

पुणे : – Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रम राबविण्यात येत असून २०८ वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात (Vadgaon Sheri Assembly Constituency) शिक्षकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पालक, विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. (Pune News)

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी, मतदार नोंदणी आणि नावात बदल करण्यासाठी, त्यांच्या डिजिटल छायाचित्र, मतदार स्लिप डाउनलोड करण्यासाठी मतदार हेल्पलाइन ॲप कसे वापरता येईल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असलेल्या परिसरात मतदान जागृती करण्याबाबत आवाहन करुन मतदानाची शपथ देण्यात आली. (Lok Sabha Election 2024)

निवडणूकीतील लोकशाहीचे महत्त्व आणि मतदानाचे महत्त्व पटवून देण्याविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वडगाव शेरी मतदार संघातील स्वीपचे नोडल अधिकारी सुहास नवले व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.