PMC Budget 2024 | सन 2024- 25 या वर्षीचे पुणे महापालिकेचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर; समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रूपयांची भरवी तरतूद

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – PMC Budget 2024 | पुणे महापालिकेचे 2024- 25 या वर्षीचे 11 हजार 601 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी मंजूर केले. समाविष्ट गावांतील विकासासाठी 550 कोटी रुपये भरीव तरतूद करण्यात आली असून पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहतील असा दावा, विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी केला.

मेट्रो चे नवीन रूट, पीएमपीएमएल साठी 500 बसेस, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या मिस्सिंग लिंक च्या कामासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जायका अंतर्गत सुरू असलेले एसटीपी प्लांट उभारणी, नदी काठ सुधार योजना ही कामे देखील मार्गी लावण्यात येतील. शहरातील तीन तलावांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. कचऱ्यापासून वीज आणि हायड्रोजन निर्मिती चे प्लांट सुरू करण्यात येणार आहेत.

शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी मॉडेल स्कूल योजनेत अधिकच्या शाळा घेण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत यासाठी जेनेरिक स्टोरची संख्या वाढवण्यात येणार आहे.

मुख्य विभागांसाठी तरतूद

१. पाणी पुरवठा – १ हजार ५३७ कोटी रुपये
२. ड्रेनेज – १ हजार २६३ कोटी रुपये
३. घनकचरा – ९२२ कोटी ९२ लाख रुपये
४. आरोग्य – ५१६ कोटी रुपये
५. वाहतूक नियोजन व प्रकल्प – ७६४ कोटी रुपये.
६. पथ विभाग – १ हजार २७८ कोटी ९० लाख रुपये.
७. पीएमपीएमएल – ४८२ कोटी ५२ लाख रुपये
८. उद्यान – १७१ कोटी ७८ लाख रुपये.
९. विद्युत – ४३२ कोटी ४४ लाख रुपये.
१०. भवन – ५१५ कोटी ९२ लाख रुपये.
११. माहिती व तंत्रज्ञान – ४४ कोटी ५८ लाख रुपये.
१२. हेरिटेज – १९ कोटी २५ लाख रुपये.
१३. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण – १२४ कोटी ६० लाख रुपये.

असे असेल उत्पन्न

१.मिळकत कर – ३ हजार 2 कोटी
२.बांधकाम परवानगी शुल्क – २ हजार ४९२ कोटी ८३ लाख रुपये.
३. स्थानिक संस्था कर – ४९५ कोटी
४. वस्तू आणि सेवा कर – २ हजार ५०२ कोटी रुपये.
५. पाणीपट्टी – ४९५ कोटी.
६. शासकीय अनुदान – १ हजार ७१६२ कोटी रुपये
७. इतर जमा – ८३३ कोटी ६४ लाख रुपये.
८. कर्ज/ कर्ज रोखे – ४५० कोटी रुपये.

Pune District Police Co-Op Credit Society Election 2024 | पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत नवपरिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय

Leave A Reply

Your email address will not be published.