Pune District Police Co-Op Credit Society Election 2024 | पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीत नवपरिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune District Police Co-Op Credit Society Election 2024 | दि पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ सन 2024 ते 2029 या कालावधीकरिता 5 मार्च 2024 रोजी मतदान झाले या निवडणूकीत नवपरिवर्तन पॅनेलच्या 13 जागांपैकी 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर काही विद्यमान संचालकांचा सहभाग असलेल्या परिवर्तन पॅनेलला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. परिवर्तन पॅनेलच्या एकाच उमेदवाराला विजय मिळवता आला. परिवर्तन पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याने मतमोजणीनंतर विजयी जल्लोष करण्यात आला यामध्ये बहुतांश उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शवला. नवनिर्वाचित संचालकांवर शहर व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याचे पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (Pune District Police Co-Op Credit Society Election 2024)

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत पाच मतदारसंघात विभागून 13 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये (१) सर्वसाधारण गट यामध्ये 8 जागांसाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर (२) महिला राखीव यामध्ये 2 जागांसाठी 6 उमेदवार आणि (३) अनुसूचित जाती व जमाती या गटामधील एका जागेसाठी 4 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. (४) इतर मागास वर्ग या गटामधील एका जागेसाठी 3 उमेदवार तर (५) भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग या गटामधील एका जागेसाठी 6 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 13 जागांसाठी 42 उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत विद्यमान संचालकांचे परिवर्तन पॅनेल आणि विरोधात नवपरिवर्तन पॅनेल आणि काही जागांवर एक अन्य पॅनेल अशी प्रमुख लढत झाली. परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेल मध्ये झालेल्या लढतीत अनेक आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. शहर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील कर्मचारी वर्ग उत्साहाने प्रचारात सक्रीय झाल्याचे पहावयास मिळाले.

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत एकूण पात्र मतदार संख्या 11 हजार 206 इतकी होती. पुणे शहर व जिल्ह्यातील 44 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण 6 हजार 236 मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. 160 मते बाद ठरली असून वैध मतांची संख्या 6 हजार 076 इतकी होती. मा. निलम पिंगळे निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-2 यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. दरम्यान श्री. संपतराव जाधव, अध्यक्ष शिखर संस्था, दत्तात्रय अण्णा गिरमकर व नामदेव आप्पा रेणुसे मा.संचालक पोलीस सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल प्रमुख श्री.महेश गंबरे तसेच प्रचार प्रमुख श्री. महेश गायकवाड (पुणे ग्रामीण) व धनेश म्हेत्रे (पुणे शहर) यांचा नवपरिवर्तन पॅनल निवडून आणण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे.

दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिकता वाढविण्यासाठी व सभासदांच्या हक्कांसाठी नवपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून विकासात्मक जाहीरनामा घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहचलो. आम्हाला विद्यमान संचालकांवर केवळ आरोप करण्यासाठी नव्हे तर प्रामाणिक, गतिमान प्रशासन देण्यासाठी नवपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली त्याला मतदारांनी कौल दिलेला आहे असे मत नवपरिवर्तन पॅनलच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे.

दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते (कंसात)
सर्वसाधारण गट नवनिर्वाचित संचालक

  1. कदम सुमित लहू (3303)
  2. काळभोर उदयकुमार सुदाम (3079)
  3. नरुटे शशिकांत हरीदास (2988)
  4. घोरपडे विठ्ठल अनिल (2972)
  5. राजेंद्र बाळकृष्ण मारणे (2866)
  6. तांबोळी जमीर बाबालाल (2836)
  7. गडांकुश दिनेश प्रल्हाद (2973)
  8. गावडे अनिल बाळासाहेब (2846) परिवर्तन पॅनल
    महिलांसाठी राखीव गट नवनिर्वाचित संचालक
  9. गोडगे-बनकर वैशाली अशोक (3382)
  10. राठोड आशा चुनीलाल (2978)
    अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग गट नवनिर्वाचित संचालक
  11. फ़ासगे आकाश नारायण (3186)
    इतर मागासवर्ग गट नवनिर्वाचित संचालक
  12. भोंग अनिल मनोहर (3430)
    भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्ग गट नवनिर्वाचित संचालक
  13. गोरे गणपत धोंडीबा (2739)

दरम्यान दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को – ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत सर्वसाधारण या मतदारसंघासाठी 8 जागांसाठी 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते यामध्ये पराभवाला सामोरे गेलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे मते प्राप्त झालेली आहेत यामध्ये खोमणे रक्मिणी गुलाब यांना 465 मते तर गवळी गणेश शिवाजी यांना 546 मते तर गायकवाड अमोल अरुण यांना 2159 मते आणि जगताप गणेश अशोक यांना 498 मते तर जठार रमेश पांडुरंग यांना 510 मते तसेच जाधव विनायक एकनाथ यांना 2209 मते तर डोळस सुधीर हरिश्चंद्र यांना 2168 मते तर दावणे महावीर म-याप्पा यांना 2704 मते आणि पालांडे राजेंद्र आत्माराम यांना 2651 मते तर भाटे विलास एकनाथ यांना 524 मते तर भोकरे मनोज सोमेश्वर यांना 555 मते तसेच भोसले सुशांत राजेंद्र यांना 546 मते तर मोमिन इम्तियाज दस्तगीर यांना 2289 मते तर वर्ष दिपक विठठल यांना 2491 मते आणि शिदे प्रशांत लक्ष्मण यांना 2755 मते प्राप्त झलेली आहेत.

या निवडणुकीत अन्य पराभूत उमेदवारांमध्ये इतर मागासवर्ग या मतदारसंघातील ताठे अनिल तुकाराम यांना 2256 मते तर जगताप गणेश अशोक यांना अवघी 441 मते मिळाली आहेत तर भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्ग या मतदारसंघातील उमेदवार माने राहूल रामचंद्र यांना 1909 मते मिळाली तसेच सामसे महावीर लक्ष्मण यांना 453 मते तर खुणवे राकेश शिवाजी यांना 382 मते प्राप्त झाली तर पांढरे गोविंद हेबंत यांना 366 ममते आणि शिंदे गणेश दत्ता यांना केवळ 176 मतांवर समाधान मानावे लागले. अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग या मतदारसंघातील उमेदवारांना अनुक्रमे बगाड संतोष काशिनाथ यांना 1927 मते प्राप्त झाली तसेच तिटकारे दिनेश मंगल यांना 514 मते मिळाली तर शिवशरण अविनाश श्रीमंत यांना अवघी 503 मते मिळाली. महिलांसाठी राखीव या मतदारसंघातील अन्य पराभूत उमेदवारांमध्ये काळे अनुपमा दिपक यांना 2249 मते मिळाली असून थोरात उषा राहूल यांना 2083 मते मिळाली तसेच शिदे सीमा शंकरराव यांना 517 तर तायडे अर्चना राहुल यांना 410 मते प्राप्त झाली आहेत.

Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

PMC On Pune Hawkers | पथारी व्यावसायीकांना देण्यात आलेल्या ‘फेरीवाला प्रमाणपत्रा’ची विक्री बेकायदेशीर

Leave A Reply

Your email address will not be published.