Pune Crime News | पुणे : साखरपुड्याच्या तयारीसाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केलं

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | तक्रारदार हे त्यांच्या लहान बहिणीच्या साखरपुड्याची पूर्व तयारी करण्यासाठी फ्लॅटला कुलूप लावून गेले होते. याच संधीचा फायदा घेऊ चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने लंपास (House Burglary) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 12 फेब्रुवारी सकाळी साडेदहा ते 18 फेब्रुवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या दरम्यान, धायरी परिसरातील रायकर मळा येथील रुद्रांगण हौसिंग सोसायटीत घडली आहे. (Pune Crime News)

याबाबत विनायक रमेश लाखन (वय-25 रा. रुद्रांग हौसिंस सोसायटी, धायरी) यांनी मंगळवारी (दि.20) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या लहान बहिणीच्या साखरपुड्याची पूर्व तयारी करण्यासाठी जनता वसाहत येथे गेले होते.

चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे व कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकरचे कुलूप उचकटून लॉकरमधील 3 लाख 55 हजार रुपये किंमतीचे 58 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादी 18 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम करीत आहेत.

Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये केलेल्या छापेमारीत 970 किलो एमडी जप्त ! आतापर्यंत एकुण 3500 कोटीचं 1700 किलो एमडी जप्त, केमिकल एक्सपर्टसह 8 जणांना अटक – पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Video)

Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Video)

Pune Crime News | पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

Pune Khadak Crime | पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन

Leave A Reply

Your email address will not be published.