Pune Lashkar Crime | पुणे : बलात्काराची तक्रार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, 5 सराईत गुन्हेगारांना अटक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Lashkar Crime | बलात्काराची तक्रार (Pune Rape Case) दिल्याचा रागातून पाच जणांच्या टोळक्याने तक्रारदार यांच्या लहान भावाला व बहिणीला दमदाटी केली. तसेच अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन सुरीने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि.20) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भिमपुरा कॅम्प मधील (Bhimpura Camp) गल्ली नं. 7 येथे घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. (Criminals Arrested In Pune)

याबाबत 21 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून अलसबा जावेद शेख, जावेद शेख, आयान शेख, सलीम शेख, अल्फेज शेख व एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. भिमपुरा कॅम्प, पुणे) यांच्यावर आयपीसी 143(अ), 144, 147, 148, 149, 323, 354, 452 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. (Criminals On Pune Police Record)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी अलसबा शेख हिचा भाऊ आफान शेख विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे. ही तक्रार मागे घ्यावी यासाठी आरोपींनी संगनमत करुन मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरात बळजबरीने घुसले. आरोपींनी फिर्यादी यांची लहान बहिण, लहान भाऊ व मोठ्या भावाला शिवीगाळ करुन दमदाटी करुन हाताने मारहाण केली.

आरोपी जावेद शेख याने फिर्यादी यांच्या लहान अल्पवयीन बहिणीला खाली पाडून तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच सुरीच्या उलट्या बाजूने मारण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला आहे. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक मनिषा वलसे करीत आहेत.

Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Video)

Pune Shivaji Nagar Police | जबरी चोरी करुन कोयते बाळगणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड (Video)

Pune Police Crime Branch | पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune Police News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कुरकुंभ येथील कंपनीवर छापा, 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.