Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला जास्त मस्ती आली का’ म्हणत तरुणावर सपासप वार, दोन सराईत गुन्हेगारांना अटक; भवानी पेठेतील घटना
पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘तुला जास्त मस्ती आली होती का’ असे म्हणत दोन सराईत गुन्हेगारांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. तसेच तरुणाच्या गळ्यातील तीस हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना भवानी पेठेत घडली आहे. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) रात्री सातच्या सुमारास भवानी पेठेतील पत्रा चाळीजवळ घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत झियान फिरोज खान (वय-22 रा. लेन नं. 1, साईबाबा नगर, कोंढवा) याने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन दानिश शेख व हिदायत शेख (दोघे रा. भवानी पेठ, पुणे) यांच्यावर आयपीसी 394, 397, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शनिवारी रात्री सातच्या सुमारास झियान खान हा पत्रा चाळी जवळ उभारला होता. त्यावेळी आरोपी हिनायत शेख त्याठिकाणी आला. त्याने झियान याची कॉलर पकडून ‘परवा तुला माज आला होता का’ असे म्हणत मारहाण केली. तर दानिश शेख याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने फिर्य़ादी याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर व डोक्यात वार केले.
त्यावेळी झियान जीव वाचवण्यासाठी जवळच्या एका गॅरेजमध्ये गेला. आरोपींनी त्याचा पाठलाग करुन गॅरेजमध्ये आले. त्याठिकाणी आरोपींनी फिर्यादीला धारदार शस्त्रांनी मारहाण केली. तर दानिश याने फिर्यादी यांच्या गळ्यातील तिस हजार रुपये किंमतीची 7.5 ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेला. याबाबत झियान याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.