Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे शहरात चोरट्यांचा सुळसुळाट, घरफोडीच्या तीन घटनांमध्ये हिरेजडीत दागिन्यासह रोकड लंपास

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये घरफोडीच्या (House Burglary) घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरातील विविध भागांतील तीन घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी साडेतीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पहिली चोरीची घटना सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत नऱ्हे येथील डी.एस.पी. वाईन शॉप येथे घडली आहे. याबाबत शुभम विजय पवार (वय-28 रा. सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, नऱ्हे) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे नऱ्हे येथे डीएसपी वाईन शॉप आहे. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शॉप बंद केले होते. यानंतर अज्ञात चोरट्याने वाईन शॉपच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेली 23 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. फिर्यादी हे गुरुवारी (दि.25) सकाळी साडे आठ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर शुभम पवार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

चोरीची दुसरी घटना खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station) हद्दीतील बोपोडी येथील तोरणा सोसायटीत घडली आहे. याबाबत अॅडबर्ट मारीओ दियास (वय-65) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा फ्लॅट बंद असताना अज्ञात चोरट्याने फ्लटच्या दरवाजाची कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार 5 जानेवारी रोजी रात्री आठ ते दहा या दरम्यान घडला आहे.

चोरीची तिसरी घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील फुरसुंगी भेकराईनगर रोड
वरील खुटवड चौकातील कॉर्नर लिफ सोसायटीत घडली आहे. याबाबत ओंकार विलास जगताप (वय-28) यांनी
हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटात
ठेवलेले दोन लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे हिरेजडीत दागिने चोरुन नेले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि.23) दुपारी
एक ते साडे सहा या दरम्यान घडला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.