Builder Vishal Agarwal Arrest | पुणे हिट अँड रन प्रकरणात बिल्डर विशाल अग्रवाल याला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी (Video)

0

पुणे : – Builder Vishal Agarwal Arrest | पुणे शहरातील कल्याणी नगर येथे झालेल्या भीषण अपघातीतील (Kalyani Nagar Accident Pune) अल्पवयीन आरोपीला लगेच जामीन मिळाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. त्यानंतर त्याला आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने विशाल अग्रवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Porsche Car Accident Pune)

पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून विशाल अग्रवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पुण्यातील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला न्यायालयाकडे आणले जात होते. त्यावेळी त्याच्यावर शाई फेकण्यात आली. वंदे मातरम संघटनेने हे काम केलं आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाबाहेर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी संघटनेच्या कार्य़कर्त्यांना रोखत त्यांना ताब्यात घेतल. यावेळी आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. या प्रकरणात अल्पवयीन जेवढा जबाबदार आहे, त्याचे वडील देखील तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप संगटनेने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.