Porsche Car Accident In Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन धनिकपुत्राने पबमध्ये 90 मिनिटात उडवले 48 हजार, पोलीस आयुक्तांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

0

पुणे : – Porsche Car Accident In Pune | पुण्यात रविवारी (दि.19) मध्यरात्री महागडी पोर्शे गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने अनिश अवधिया (Aneesh Awadhiya) आणि अश्विनी कोस्ट (Ashwini Costa Jabalpur) यांना धडक दिली (Pune Kalyani Nagar Accident). यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे पुण्यासह राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. तसेच या प्रकरणात नवनवीन माहिती रोज समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी सांगितले की, पुण्यातील नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने त्यांच्या मित्रांसह अपघाताआधी दोन पबला भेटी दिल्या. त्यापैकी एका पबमध्ये ते 90 मिनिटे थांबले होते. केवळ दीड तासात अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी 48 हजार रुपये उडवले होते. (Pubs In Pune)

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी शनिवारी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी कोझी पबमध्ये प्रवेश केला होता. तिथे त्यांनी 90 मिनिटांत 48 हजार रुपयांचे बिल केले. तिथून ते 12 वाजून 10 मिनिटांनी ब्लॅक मॅरियट या दुसऱ्या पबमध्ये गेले, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

अमितेश कुमार यांनी सांगितले की, आम्ही कोझी पबमधून 48 हजार रुपयांचे बिल घेतले आहे. अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी कोणते मद्य घेतले त्यासाठी किती खर्च केला याची माहिती आहे. तसेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमितेश कुमार म्हणाले, अल्पवयीन चालकाला अपघाताच्या काही तासानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील (Manoj Patil IPS) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने कार चालवण्यासाठी मद्यपान केले. तो काही पबमध्ये गेला होता. आरोपी आणि त्याचे मित्र मद्यपान करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.